Home इतर आई किंवा वडील यापैकी एक जरी कोरोना मुळे दगावल्यास सरकारने त्या कुटुंबाला...

आई किंवा वडील यापैकी एक जरी कोरोना मुळे दगावल्यास सरकारने त्या कुटुंबाला मदत/ अनुदान द्यावे

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10101*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

62 views
0

आई किंवा वडील यापैकी एक जरी कोरोना मुळे दगावल्यास सरकारने त्या कुटुंबाला मदत/ अनुदान द्यावे

– नागपूर जिल्हा सरपंच परिषदेचे मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी द्वारे निवेदन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर: केंद्र सरकार व राज्य सरकारने नुकतीच एक मदत योजना जाहीर केली आहे ज्यामध्ये वर्ष 2020 आणि 2021 या काळात   कोवीड मुळे ज्या गरीब कुटुंबातील पती आणि पत्नी  दोघेही दगावल्यास त्यांच्या मुलांना   सरकार कडून अनुदान दिले जाईल. परंतु असे आढळून आले आहे की ज्या कुटुंबातील पती किंवा पत्नी एकटा जरी दगावला तरी गरीब कुटुंबातील अनाथ मुलांना त्याचा चांगलाच फटका बसला आहे. या अनुषंगाने  अखिल भारतीय सरपंच संघटना परिषद नागपूर टिमच्या वतीने सरपंच श्री.  मोरेश्वर उर्फ बंडूभाऊ कापसे, खैरी यांनी आज नागपूर निवासी उपजिल्हाधिकारी माननीय अविनाश जी कातडे यांना आज  निवेदन दिले.