बहुजन मुक्ती पार्टी च्यावतीने महागाईच्या विरोधात धक्का मारो आंदोलन मंगळवारी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10097*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

122

बहुजन मुक्ती पार्टी च्यावतीने महागाईच्या विरोधात धक्का मारो आंदोलन मंगळवारी

 

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : बहुजन मुक्ती पार्टी (युवा प्रकोष्ठ) यांच्या वतीने महागाईच्या विरोधात “धक्का मारो आंदोलन ” येत्या मंगळवार ला दि.15 जूनला सविधान चौक येथून दुपारी १२:३० वाजता पासून जिल्हाधिकारी यांच्या ऑफिस पर्यंत ” महागाई विरोधात धक्का मारो आंदोलन ” महाराष्ट्र राज्याचे सहसचिव मा. गणेश चौधरी आणि त्रिशला ढोले यांच्या नेतृत्वात केलेले आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, एलपीजी, घरगुती गॅसच्या आणि राज्य सरकारने वाढवलेल्या वीज बिल व खाद्यतेलाच्या दरवाढी विरोधात ही दरवाढ तातडीने मागे घेण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी व महिला आघाडी यांच्यातर्फे आंदोलन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सरकारने सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल केले आहे. दुसरीकडे महागाईचा आगडोंब उसळला आहे.
मोदी सरकारने जनतेचे पंचवीस लाख कोटी रुपये ट्रॅक्सच्या नावाने लुटले आहे. कोरोना काळात आवश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले असून ” धक्का मार आंदोलनात ” बहुजन मुक्ती पार्टी चे इतर पदाधिकारी या आंदोलनात आपल्या प्रमुख मागण्या करिता उपस्थित राहणार आहे. या मध्ये सहभागी विजय राजूरकर महासचिव, त्रिशला ढोले सहयोगी महिला आघाडी, राजेंद्र पिसे जिल्हाध्यक्ष नागपूर, ललित सोमकुवर जिल्हा अध्यक्ष, विजय वानखेडे विधानसभा अध्यक्ष, अनिल बोडके कार्याध्यक्ष नागपूर जिल्हा, धीरज डोंगरे उत्तर नागपूर विधानसभा अध्यक्ष, अनिल नागरे कार्याध्यक्ष नागपूर शहर आणि महेशकुमार शहारे मीडिया प्रभारी यांचा समावेश राहणार आहे. असे राज्याचे सह सचिव गणेश चौधरी यांनी कळविले आहे.