Home Breaking News कोरोना महामारीमुळे आर्थिक टंचाई, नागपूर जिल्ह्यात वाढले आत्महत्या व गुन्हेगारीचे प्रमाण

कोरोना महामारीमुळे आर्थिक टंचाई, नागपूर जिल्ह्यात वाढले आत्महत्या व गुन्हेगारीचे प्रमाण

0
कोरोना महामारीमुळे आर्थिक टंचाई, नागपूर जिल्ह्यात वाढले आत्महत्या व गुन्हेगारीचे प्रमाण

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – वर्षभरापेक्षा अधिक काळ कोरोना महामारीच्या संकटाने उद्योग तसेच लघु व्यवसायाला ग्रासले आहे़ शासनाने कितीही आश्वासनांच्या व वचनपुर्ततेच्या फैरी झाडल्या तरी यादरम्यान सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसला़ अनेकांच्या नौकºया गेल्या तर कोरोना महामारीत अनेकांचे उद्योग उद्धस्त झाले़ ‘हातावर पोट’ असलेल्यांना याची जाणीवही होत आहे़ वैद्यकिय उपचारापोटी बचत केलेला पैसाही हातचा सुटलेला आहे़ यामुळे मानसिक त्रासात असलेल्यांचे प्रमाण सर्वत्र पहायला मिळत आहे़ कर्जाचा बोझा फेडायचा कसा, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या समस्सेने नैराश्येपोटी अनेकांनी आपले जीवन संपविले़ देशासह संपुर्ण जगायला कोरोना रोगाची काळी सावली असली तरी, नागपूर जिल्ह्यातील आत्महत्यांचे आकडे मोठ्या प्रमाणात दिसत आहे़
आत्महत्यांसोबतच गुन्हेगारी प्रवृत्तीयांवरही कुणाची आडकाठी राहीली नाही़ गुन्हेगारांनी लुटपाट व हफ्तेखोरीच्या माध्यमातून अधिक प्रमाणात दहशत निर्माण केलेली आहे़ घरातील चोरी, दुचाकी-चारचाकी चोरी, दागिने घरगुती साहित्याची चोरी यांसह लुटपाटीच्या घटनांचाही आलेख वाढता आहे़ हुडकेश्वर हद्दीतील पिपळा फाटा येथे काही दिवसांपूर्वीच घडलेल्या एका घटनेने सारेच हादरून गेले़ कँटरिंगचा व्यवसाय ठप्प असल्यामुळे पैशाच्या गरजेपोटी युवकाला बिल्डरच्या घरात शिरकाव करीत घरातील सदस्यांना ओलीस ठेवल्याचा प्रकार नुकताच घडला़ नकली बंदुक व एका चाकुच्या जोरावर त्याने कुटुंबाला बंधक बनविले व ५० लाखांची मागणी करू लागला़ या संपुर्ण थरारानंतर अटक करण्यात आलेला हा अट्टल गुन्हेगार नसून पैशांच्या अडचणीमुळे त्याने गुन्हेगारीची ही योजना आखली असल्याचे उघडकिस आले़ पैशांच्या अभावापोटी आत्महत्या व गुन्हेगारी सारख्या निर्णयाचा मार्ग अवलंबित असल्यामुळे आर्थिक टंचाईची दाहकता लक्षात येते़ गुन्हेगारांची मानसिकता शिगेला पोहोचल्यामुळे शहरात हत्यांचे प्रमाणही वाढतेच आहे़ क्षुल्लक कारणांवरून खुन व वचपा काढण्याचे सत्र सुरू आहे़ कौटुंबिक कलह उंबरठ्यावर येत आहे़ त्यामुळे सर्वांना एक च विनंती आहे की, ही चिंता काही दिवसांचीच आहे़ जीवनयात्रा संपवून किंवा गुन्हेगारीचा मार्ग पत्करून काहीच प्राप्त होणार नाही व संसार तसेच कुटुंबीय उघड्यावर पडतील़ त्यामुळे समाज व कुटुंबाला आधार देण्याची मानसिक तयारी ही समाजातील प्रत्येकाने ठेवयला हवी़