दिग्रस – दारव्हा महामार्गाचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करा अन्यथा आंदोलन

148

विदर्भ वतन न्युज पोर्टल, अश्विन इंगळे (यवतमाळ प्रतिनिधी) – यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे आज चक्काजाम आंदोलन करण्याचे दिग्रस वासियांनी ठरविले होते. दिग्रस दारव्हा महामार्गाचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे ही त्यांची मुख्य मागणी होती. तर भर पावसाळ्याच्या सुरुवातीला संबंधित कंत्राटदाराने मानोरा चौक ते नवीन बस स्थानकपर्यंतचा रस्ता खोदून ठेवल्याने पावसाचे पाणी साचून त्या परिसरातील निवासी घरांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच या चौकातील व्यावसायिकांना ही धोका निर्माण झाला होता. त्यामुळे येथील नागरिक व व्यावसायिकांमध्ये असंतोष आहे. करिता नागरिकांनी आज चक्काजाम आंदोलन करण्याचे ठरविले होते. तत्पूर्वी प्रशासनाने पत्र देऊन सदर आंदोलन करण्यात येऊ नये अशी सूचना दिली. पण, नागरिकांचा असंतोष पाहून अखेर निर्धारित वेळेवर आंदोलन सुरू झाले. या वेळेला स्थानिक प्रशासकीय अधिकाºयांसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी आंदोलकांना आश्वासन दिले की, येत्या एका महिन्यामध्ये सदर रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे आंदोलकांनी नमती भूमिका घेऊन अधिकाºयांनी दिलेल्या वेळेपर्यंत वेट अँड वॉच ची भूमिका घेतली. त्या नंतर मात्र तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सांगून सध्याचे आंदोलन त्या काळापर्यंत स्थगित करण्याचे सांगितले. या आंदोलनाची धुरा संजीव चोपडे, नूर मोहम्मद खान, अजिंक्य मात्रे, बाळू जाधव, केतन रत्नपारखी, मिलिंद मानकर, विनायक दुधे, सय्यद अक्रम, उत्तमराव ठवकर, यादवराव गावंडे, संदीप रत्नपारखी, मकसूद भाई, दिवाकर राठोड व मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सांभाळली.