Home Breaking News उड्डाणपुलावर भरधाव चारचाकींची समोरासमोर धडक, पाच जखमी

उड्डाणपुलावर भरधाव चारचाकींची समोरासमोर धडक, पाच जखमी

161 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – शुक्रवार सकाळपासूनच नागपूर शहरात पावसाने दमदार हजेरी लावली़ पावसाची रिमझिम सुरू असतांनाच गाडीचा ताबा सुटल्याने दोन कार समोरासमोर भिडल्या़ यात ५ जण जखमी झाले आहे़ नागपूरातील रिझर्व बँक चौकाजवळच्या उडाणपुलावर हा अपघात झाला़ सकाळी ९ वाजेच्या दरम्यान एक निळ्या रंगाची स्विफ्ट कार उड्डाणपुलावरून नागपूर ते मानकापूरच्या दिशेने जात होती, तर पांढºया रंगाची अल्टो कार मानकापूर कडून रिझर्व बँक चौकाच्या दिशेने येत होती़ दोन्ही गाड्या भरधाव वेगात होत्या़ तर पावसाची सतत धारही सुरू होती़ भरधाव वेगात असणाºया गाडीवरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली़ दोन्ही गाड्यांच्या झालेल्या चुराड्यावरून अपघाताची भिषणता लक्षात येत होती़ उड्डाणपुलावर एका बाजुच्या सुरच कठड्यांची उंची कमी आहे़ गाड्यांचा वेग आणखी अधिक असता तर चारचाकी पुलाखाली जाण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती़ दैव बलवत्तर म्हणून असे काही घडले नाही़ यावेळी नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला सुचना दिली़ तसेच गाडीत अडकलेल्या चालकाला बराचवेळ शर्थीच्या प्रयत्नाने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला़ अपघातातील जखमींचा उपचार सुरू आहे तर पुढील तपास पोलिस विभाग करीत आहे़