वैमनस्यातून अपहरणानंतर १५ वर्षीय मुलाची हत्या, नागपूरात घडला थरार

210

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर : नागपुरात दिवसेंदिवस हत्यासत्र वाढतच आहे़ आपसातील वैमनस्यातून एका मुलाची हत्या करण्यात आली़ राज पांडे या १५ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. आरोपीने हत्या करून हुडकेश्वर रिंगरोड परिसरात राज याचा मृतदेह फेकला आहे. आरोपीने मुलाच्या खंडणीसाठी एका व्यक्तीच्या मुंडक्याची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण न झाल्याने आरोपीने राज पांडेची हत्या केली असे तपासावरून निदर्शनास आले़
नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरामाता नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सुरज शाहू असे आरोपीचे नाव आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतून क्रिकेट खेळायला गेलेल्या राजचे दुचाकीस्वाराने गुरूवारी सायंकाळी 6 च्या सुमारास अपहरण केले. मुलगा घरी परतला नाही म्हणून घरची मंडळी काळजीत होते. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. याचवेळी अपहरणकर्त्याचा राज पांडेच्या पालकांना फोन आला. तुमच्या मुलाचे अपहरण करण्यात आले असून त्याची सुखरूप सुटका करायची असेल तर राजच्या काकाचे शीर आणून द्या, या मागणीमुळे पालकांसह पोलीसही चक्रावले होते. सुरजने गुरुवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास राज याचे अपहरण केले होते. खंडणी म्हणून आरोपीने मृत राज याच्या काकांच्या मुंडक्याची धक्कादायक मागणी केली होती. मागणी पूर्ण न झाल्याने आरोपीने मुलाची हत्या करुन मृतदेह हुडकेश्वर रिंगरोड परिसरात फेकून दिला होता. पोलीस या हत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत.