विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. त्यातच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. अशात गरीब कुटुंबातील मुलांनी आॅनलाइन शिक्षणाचा खर्च कसा उचलायचा, हा यक्ष प्रश्न आहे. याच प्रश्नाला सामोरे जाणाºया एका चिमुकलीने मुख्याध्यापकांना भावनिक पत्र लिहिले. तिच्या पत्राची मुख्याध्यापक नीलेश सोनटक्के यांनी दखल घेतली आणि शाळेने तिचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मात्र हीच बाब ह्युमानिटी सोशल फाउंडेशनच्या संस्थापक पुजा मानमोडे यांना कळताच त्यांनीही सहाव्या वर्गात शिकणाºया इशिका भाजेला मदतीचा हात दिला़ तिच्या आँनलाईन अभ्यासाकरिता नवीन मोबाईल घेऊन तर दिलाच शिवाय पुढील शिक्षणाकरिता मदत करण्याचीही तयारी दर्शविली़ यामुळे इशिकाच्या चेह-यावर हास्य फुलले आहे. इशिका ला पुजा मानमोडे यांनी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या उपस्थितीत मोबाईल दिला तसेच तिचे पालकत्व स्विकारले़
इशिका भाजे असे चिमुकलीचे नाव आहे. ती अकरा वर्षाची असून, नरसाळा येथील सत्यसाई विद्यामंदिरात सहाव्या वर्गात शिकते. तिला एक मोठा भाऊ आहे. तो बारावीत शिकतो. दोघेही नरसाळा येथे आईच्या आई-वडिलांकडे राहतात. मात्र, कोरोनामुळे त्यांच्यावर कठीण वेळ आली आहे. पत्रात तिने मुख्याध्यापकांना म्हटले होते की, सर, परवडेल अशी उपाययोजना करावी. शाळेकडून काही होत नसेल तर सरकारकडून मदत होईल का? हे बघावे. जेणेकरून माझ्यासारख्या अन्य विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न सुटेल, ही नम्र विनंती, असाही मजकूर तिने लिहिला होता. इशिकाला शिक्षणासाइी मिळालेल्या मदतीमुळे चेहºयावर हास्य फुलले आहे. तसेच पुजा मानमोडे यांना आपल्या शाळेतील विद्यार्थीनीला केलेल्या मदतीबाबत सत्यसाई विद्यामंदिर ने आभार पत्र दिले़
अशातच इशिकाने एक भावनिक पत्र पुजा मानमोडे यांना लिहीले़ ज्यामध्ये तिने पुजा मानमोड यांचा उल्लेख ‘पुजा आक्का’ असा केलेला आहे़ तिने या पत्रात लिहीले की, पुजा आक्का तुम्ही मला शिक्षणासाठी मदत केल्याबद्दल मी तुमचे आभार कधीच विसरणार नाही़ मला खूप शिकायचे आहे़ तुम्ही केलेल्या या मदतीमुळे मी पुढे अधिक मेहनत व परिश्रम घेऊन चांगला अभ्यास करेल पुजा आक्का़
पुजा मानमोडे व ह्युमँनिटी सोशल फाउंडेशनच्या मदत कार्याचे सर्व स्तरावरून कौतूक होत आहे़ इशिका ही आता माझ्या घरची सदस्य आहे़ पुढे तिच्या आनंदात माझा आनंद असेल असे पुजा मानमोडे यांनी सांगितले़

You missed