एकाच तरुणाच्या दोन लैला, एकीने गळपास घेऊन केला फैसला

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10042*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

199

एकाच तरुणाच्या दोन लैला, एकीने गळपास घेऊन केला फैसला

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, वृत्तसंस्था/नोयडा- मित्र किंवा मैत्रीण हे आपल्या सर्वात जवळचे आणि जीवाभावाचे असतात. आपण कुटुंबीयांशी अगदी सख्ख्या भाऊ बहिणींशी जे शेअर करत नाही, ते मित्र मैत्रिणींशी करतो असेही म्हटले जाते. पण जेव्हा विषय प्रेमाचा असतो तेव्हा अगदी जवळचा मित्रही शत्रू बनत असतो. असाच काहीसा प्रकार नोयडामध्ये पाहायला मिळाला. याठिकाणी दोन मैत्रिणींचे एका तरुणावरून भांडण झाले आणि त्यातून एका तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
ही घटना नोयडाच्या सूरजपूर परिसरातील आहे. याठिकाणी एकाच तरुणावर प्रेम असल्याच्या कारणावरून दोन मैत्रिणींमध्ये वाद झाला होता, त्यातून एकीने आत्महत्या केली. सूरजपूर याठिकाणी राहणा-याा कोमलचे एका मुलावर प्रेम होते. त्याचप्रकारे तिच्या जवळच्या मैत्रिणीचेही एका मुलावर प्रेम होते. पण जेव्हा या दोघींना कळले की त्यांचे दोघींचेही प्रेम असलेला तरुण एकच आहे, तेव्हा यावरून वाद सुरू झाला. कोमल आणि तिच्या मैत्रिणीमध्ये वाद झाले. प्रेमाच्या त्रिकोणातून निर्माण झालेला कोमल आणि तिच्या मैत्रिणीचा वाद हा प्रचंड वाढत गेला. बुधवारी रात्रीदेखील या दोन मैत्रिणींमध्ये यावरून वाद झाला. त्यानंतर तणावामध्ये कोमलने बुधवारी रात्री गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी कोमल आणि तिच्या मैत्रिणीचा फोनवरूनदेखील संबंधित तरुणावरून वाद झाला होता. अखेर त्यांच्या वादानंतर तणावात कोमलने गळफास घेत आत्महत्या केली.
सूरजपूर येथील प्रभारी पोलिस निरीक्षक अजय कुमार यांनी सांगितले की, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृत कोमल आणि तिच्या मैत्रिणीच्या वादाबाबत पोलिस सध्या माहिती घेत आहेत.