Home Breaking News लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र-शरद पवार

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र-शरद पवार

0
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र-शरद पवार

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था/मुंबई-लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र राहील, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. आपण राज्याला वेगळ्या विचारांचे सरकार दिले असून पुढील पाच वर्ष हे सरकार टीकेल असा विश्‍वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आपण राज्याला वेगळ्या विचारांचे सरकार दिले. शिवसेना आणि आपण एकत्र काम करू शकतो असे कोणाला पटले नसते. पण आपण लोकांना पर्याय दिला आणि त्यांनी तो स्वीकारला. तिन्ही पक्षांनी योग्य पावले टाकली आणि आज हे आघाडी सरकार चांगल्या रितीने काम करत आहे, असे कौतुक शरद पवारांनी यावेळी केले.
प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांसोबत स्वतंत्र बसले आणि चर्चा केली यावर वेगवेगळ्या शंका घेण्यात आल्या असे सांगत शरद पवारांनी यावेळी टीकाकारांना उत्तर दिले. शिवसेनेसोबत आपण कधी काम केले नाही पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्‍वास असणाराच आहे. ज्यावेळी जनता पक्षाचे राज्य आले त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला असताना काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला. तो म्हणजे शिवसेना. नुसते पुढे आले नाहीत तर इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी शिवसेना एकही उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभा करणार नाही असा निर्णय घेतला. पक्षाचा नेता असा निर्णय घेतो तुम्ही विचार करा. पण त्याची चिंता कधी बाळासाहेबांनी केली नाही. त्यांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द निवडणूक न लढवत पाळला. त्यामुळे कोणी काहीही शंका घेतली तरी शिवेसनेने ज्या पद्धतीने त्या कालखंडात भक्कमपणाची भूमिका घेतली तीच भूमिका सोडण्यासंबंधी कोणी सांगत असेल तर तसे होणार नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.