Home Breaking News आंबेडकरांचे पोस्टर लावले म्हणून अमानुष मारहाण; तरुणाचा मृत्यू

आंबेडकरांचे पोस्टर लावले म्हणून अमानुष मारहाण; तरुणाचा मृत्यू

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10020*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

186 views
0

आंबेडकरांचे पोस्टर लावले म्हणून अमानुष मारहाण; तरुणाचा मृत्यू

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : जयपूर – राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यातील एका गावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर प्रकरणी सुरू असलेल्या वादाने चांगलाच पेट घेतला. हे पोस्टर लावल्याप्रकरणी जमावाने तरुणाला बेदम मारहाण केली असून या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आणि काही वेळातच त्याने प्राण सोडले. या अमानुष घटनेबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमानगढच्या किकरालिया गावाचा रहिवासी असलेला २१ वर्षीय विनोद बामनिया हा भीम आर्मीचा सदस्य होता. त्याच्यावर ५ जून रोजी ओबीसी समाजाच्या काही लोकांनी हल्ला केला. ज्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर विनोदला जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दोन दिवसांतच त्याचे निधन झाले.

तसेच या प्रकरणात विनोदच्या परिवाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दोघांना अटक करण्यात आली असून यापैकी एका व्यक्तीचे नाव अनिल सिहाग असून दुसऱ्या व्यक्तीचे नाव राकेश सिहाग आहे. या दोघांविरोधात पोस्टर फाडल्याप्रकरणी आणि मारहाण केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. या दोघांनी मारहाण करत असतानाच जातीय वक्तव्य केले असल्याचेही या एफआयआरमध्ये लिहिले आहे.