Home Breaking News मालाड दुर्घटनेनंतर आता दहिसरमध्ये तीन घरं कोसळली, एका तरुणाचा जागीच मृत्यू

मालाड दुर्घटनेनंतर आता दहिसरमध्ये तीन घरं कोसळली, एका तरुणाचा जागीच मृत्यू

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10011*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

127 views
0

मालाड दुर्घटनेनंतर आता दहिसरमध्ये तीन घरं कोसळली, एका तरुणाचा जागीच मृत्यू

 

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – मुंबईत बुधवारी मध्यरात्री मालाडमध्ये तीन मजली घर कोसळून ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर २४ तास उलटत नाहीत तोवर दहिसरमध्ये दुसरी घटना घडली आहे. यामध्ये तीन घरे कोसळली असून यात एका २७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दहिसर येथील शिवाजी नगर मधील लोखंडी चाळ येथे तीन घरे कोसळली आहेत. मुसळधार पावसामुळे ही घरे कोसळली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

या दुर्घटनेत प्रद्युमन सरोज या 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे तर आणखी एक तरुण जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू आहे.

मालवणीत इमारतीचा भाग कोसळून 11 मृत्यू 

मुंबईतील मालाड मालवणी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास एका चार मजली इमारतीचा भाग शेजारील घरांवर कोसळला. या दुर्घटनेत तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले आहेत.