Home Breaking News पाच दिवस सतर्कतेचे! मुंबईसह ठाणे, पालघर, रागयडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

पाच दिवस सतर्कतेचे! मुंबईसह ठाणे, पालघर, रागयडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10007*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

57 views
0

पाच दिवस सतर्कतेचे! मुंबईसह ठाणे, पालघर, रागयडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :मुंबई – महाराष्ट्रात मॉन्सूनला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी मुंबईसह अनेक शहरांची दाणादाण उडाली. रस्त्यांवर आणि रुळांवर पाणी साचल्याने चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. पहिलाच पाऊस इतका त्रास दायक ठरल्यानंतर आता मुंबईसह मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार पवासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने याबाबतची माहिती दिली.

मुंबईत आजही सकाळपासून पाऊस कोसळत आहे. ठाण्यातही रिमझिम सरी बसरल्या. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केलं आहे. बुधवारी चेंबूर 280.52 मिमी, मानखुर्द, गोवंडी – 248.52 मिमी, घाटकोपर – 21022 मिमी तर कुर्ला परिसरात 231.45 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. पश्चिम उपनगरात मरोळ येथे सर्वात जास्त म्हणजे 272 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर अंधेरी (पूर्व) 271.76 मिमी, मालवणी 253.88 मिमी, गोरेगाव 217.36 मिमी, अंधेरी ( प.) 215.03 मिमी, दहिसर 208.22 मिमी, सांताक्रूझ 207.64 मिमी, वर्सोवा 207.44 मिमी, वांद्रे 86.99 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.